- मनाली-लेह-खार्दुंगला सायकल मोहीम
गडद तपकिरी, लाल-पिवळे, हिरवे-नाळेअसे अनेक रंग लेऊन सजलेला उत्तुंग हिमालय पर्वत अन् विस्तीर्ण पसरलेला हा प्रदेश. आपल्या संस्कृतीची खोलवर रुजलेली मुळे जपणारी सिंधु नदी, सिंधु-झंस्कार संगम, लाहौल-स्फिती व्हॕली, बर्फानी आच्छादलेली चमचमणारी हिमशिखरे, विरळ हवा, बर्फवृष्टी, आणि उग्र निसर्ग आणि त्याच्या मर्जीवर अवलंबून असलेले जेमतेम४-६ महिने नांदणारे जनजीवन. अशा अनेक कारणांमुळे लेह-लडाख हा प्रदेश पर्यटकांना विशेषतः साहसवीरांना खुणावात असतो.
मनालीच्या १५ माइल्स बेसकँपला मनाली-लेह-खार्दुंगला सायकल मोहीमेत भाग घेण्यासाठी संपूर्ण भारतातून आलेले जवळपास ८०-९० जण सज्ज झाले. पहिल्या दिवशी सरावासाठी नग्गरला सायकल फेरी झाली. एप्रिल-मे महिन्यात रोहतांगला खूप बर्फ असते तेंव्हा मढीपर्यंत किंवा त्याच्या मागेपुढे जाता येते. पहिला पास होता रोहतांग पास; रोहतांगची तिखट चढाई याआधी चारचाकीनी अनुभवली होती. रोहतांगच्या वाटेवर मढी हा पहिला उंचीवरचा पडाव होता.
मनाली (४०००फूट) - मढी (१११००फूट) - रोहतांग (१३०५८फूट) असा वरवर चढत जाणारा मार्ग होता आणि याच्या काठिण्यपातळीची कल्पना पहिल्या दिवशी मढीला पोहचतानाच आली. मढी कँपमधून निघाल्यावर पहिल्या चढाईवरच गिअर पडला नाही, चेन अडकली आणि मी ओय-ओय म्हणत भुईची भेट घेतली रोहतांगच्या वाटेवर रानी नल्ला येतो.
एकीकडे कोसळणारा धबधबा आणि एकीकडे धुक्यानी भरलेली खोल दरी असे हे रम्य स्थळ होते. शिवाय चहा-काफी, मका, भेळ असे पदार्थही मिळत होते. पास जवळ येऊ लागला तस-तशी थंडी वारा यांची तीव्रता जाणवू लागली. जितका चढ कस बघणारा तेवढा जास्त आनंद ही उंची सायकल चालवता गाठताना होतो. पासवर हवामान लगेच खराब होते, जास्त थांबता येत नाही. त्यानंतर सिशुला घेऊन जाणार रोमहर्षक चित्तथरारक उतारआला. या उतारावर तुफान वाऱ्याचे थैमान होते. अक्षरशः आपले पॕराशुट होऊन आपण उडून जातोय की काय अशी अवस्था. एका बाजूला खोल दरी, समोरुन वेगानी येणारी वाहने, वारा कुठे उडवतोय याचा काहीच नेम नाही, सायकल गदागदा हालत होती. जोडीला भुरभुर पाऊस आणि गोठवणारी थंडी होती. हा सारा थरार अनुभवायलाच हवा.सिशु कँप निसर्गाच्या कुशीत सुंदर ठिकाणी होता. ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. नदीवर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत होते. चिमणे पक्षी बागडत होते.
सिशु कँपला जाताना अटल टनेलची दुसरी बाजू आली. मनालीहून निघाल्यावर मढीला जाताना याच अटल टनेलची वाट न घेता रोहतांगची वाट चोखाळली होती आणि दुसऱ्या दिवशी रोहतांग पार केल्यावर अटल टनेलची दुसरी बाजू आली. या अटल टनेलमुळे किती प्रचंड अंतर वाचून प्रवास सुगम झालाय हे यावरुन लक्षात येईल. रोहतांगच्या रस्त्यावरच्या अवजड वाहनांचा वावरही या टनेलमुळे बराच कमी झाला आहे. सिशुला जाताना रोहतांगाचा उतार संपल्यावर रोलिंग टेरेन सुरु होतो. ऊन पडले होते. त्यामुळे कपड्यांचे एकावर एक चढवलेले थर उतरविणेआवश्यक झाले. हे केले तर थोडच पुढे गेल्यावर पाऊस सुरु झाला. मग पुन्हा थाबून विंडचीटर घालणे क्रमप्राप्त होते. बंजी काॕर्डनी कॕरिअरला बांधलेली सॕक काढणे आणि परत बांधणे हा एक वेळखाऊ प्रकार असतो त्यापेक्षा कॕरिअरला अडकवायच्या सायकल बॕग सुटसुटीत पडतात.
सिशुहून जिस्पाकडे जाणारा रस्ता सुरुवातीला सरळसोट आणि नंतर चढणारा होता. एका बाजूला नागमोडी वळणे घेत जाणारी बियास सोबत होती.
राफ्टिंग पाॕइंट, झिप लाइन इ. वाटेत दिसत होते. पर्यटकांचा वावर जाणवत होता.अधून-मधून झाडी दर्शनीय होती. काही ठिकाणी दरडी कोसळून रस्त्याची पार दैना उडाली होती. त्यात अवजड वाहने, जबलपूर फॕक्ट्रीचे सैन्याचे ट्रक यांचा सुळसुळाट होता. सगळी वाहने तीव्र चढामुळे काळा धूर ओकत जातात. याचा फार उपद्रव होतो.
हायवेवरुन जवळजवळ दरीत उतरतोय की काय असे वाटावे इतका खोल केलाँग गावाचा रस्ता होता. केलाँगचा बाजार हा ३-४ दिवसांनी या वाटेवर लागलेला मोठा बाजार. काही छोट्या वस्तू वगैरे घेण्यासाठी मुद्दाम खाली उतरुन आवर्जून आत शिरलो. हे चिमुकलं गाव वरुन फारच आकर्षक दिसत होतं. दोन डोंगरांच्या कुशीत, नदीच्या सान्निध्यात पिटुकली दिसणारी टुमदार रंगीबेरंगी घरे आणि हिरवेगार मैदान बघून डोळ्यांना आल्हाद वाटला. इथे एका हाॕटेलमध्ये स्थानिक अन्न चाऊ मीन नूडल्स , मोमो वगैरेची चव घेतली पण त्यासाठी दोन तासांची तपश्चर्या करावी लागली.
रणरणत्या उन्हात केलाॕगचा चढ चढून सायकली पुन्हा महामार्गावर रस्ता कापू लागल्या. एका बाजूला डोंगर होते झुळझुळ वाहणारा वारा होता. पण जरा थांबावं म्हटलं तर जिथे-तिथे निखळलेले दगड वगैरे दिसत. तशीच सायकल दामटत मध्येच विसावा घेत प्रवास सुरु होता. सोबती भेटत होते, ओळखी होत होत्या. आजचा चढ संपल्यामुळे मन आणि पाय जरा सैलावले होते. मग बाइकर्स कडून सूचना मिळाली. मागे कोण आहेत ते समजलं आणि आता जर कोणी उशीरा पोहचत असतील तर गाडीतून घेऊन जावे लागेल अशी खबर मिळाली. समझनेवाले को इशारा काफी होता है..... वाटेत दिसणाऱ्या सगळ्यांना इशारा देत इथून वाघ पाठी लागल्यासारखी जी धूम ठोकली ते थेट जिस्पा कँपलाच चाके थांबली.
भागा नदीच्या तीरावरच्या माउंटेनीअरिंग इन्स्टिट्यूटच्या परिसरात जिस्पा कँप होता. निळे आकाश, तपकिरी डोंगरांमधून डोकावणारा सूर्य, हिरवी झाडी, खळाळती नदी असे सुरेख, प्रसन्न दृश्य होते.

सुंदर वर्णन 👌
ReplyDeleteवाह वाह
ReplyDeleteसुंदर... पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत 🙂
ReplyDeleteKhupach chaan feel like traveling with you
ReplyDeleteमस्तच..
ReplyDeleteखूपच साहसी आणि वेगळा अनुभव. लिखाणाची शैली ओघवती असल्यामुळे प्रत्यक्ष तिकडे जाऊन आल्यासारखं वाटलं. भाग 2 वाचण्याची उत्कंठा लागली आहे.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteपरत एकदा राईड करतो आहे असेच वाटले. तीच दृश्य पुनःएकदा डोळ्यासमोर आली.
ReplyDeleteतूसी ग्रेटच हो! हार्दिक अभिनंदन! 💐
ReplyDeleteव्वा, छान लिहिलं आहे. आता गिरीमित्र च्या ब्लॉग स्पर्धेत भाग घ्या.
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteGreat mam, congratulations..
ReplyDeleteआमच्या सगळ्यांच्या अनुभवांना वाचा दिलीस, शब्द दिलेस..... धन्यवाद!!!! अप्रतिम वर्णन, शब्दांकन..
ReplyDeleteनमिता
ReplyDeleteअतिशय मस्त आणि झकास वर्णन... सर्व आठवणी जागृत झाल्या... तुझ्या बरोबर सफर करतोय असे जाणवले...
सतीश जाधव
खूप छान .. 🌹🌹
ReplyDeleteआटोपशीर तरीही सर्वसमावेशक... 👌🏻👌🏻👏🏻👏🏻💐💐